esakal | जीवावर उदार होऊन कोविड योद्ध्यांची रुग्णसेवा, सबंध महाराष्ट्राला 'आरोग्य'चाच हेवा!

बोलून बातमी शोधा

Covid Vaccination

जीवावर उदार होऊन कोविड योद्ध्यांची रुग्णसेवा, सबंध महाराष्ट्राला 'आरोग्य'चाच हेवा!

sakal_logo
By
विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे कार्यक्षेत्र, चांगल्या कामाचा लौकिक आणि त्यातच कोरोनाचा कहर या पार्श्वभूमीवर या आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी जीवावर उदार होऊन कोविडयोद्धे बनून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत आरोग्यसेवा बजावत आहेत.

सध्या कोविड लस घेण्यासाठी, कोविड तपासणीसाठी तसेच इतर आजारांच्या उपचारासाठी येथील आरोग्य केंद्रात मोठी गर्दी होत आहे. आरोग्यसेवा देतानाच या गर्दीवर नियंत्रण मिळवताना येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक उडत आहे. मुळातच या केंद्रातील काही जण कोविड बाधित झाले आहेत. तरीही इतर कर्मचारी डगमगून गेले नाहीत. उलट मोठ्या धैर्याने अधिक खबरदारी घेत गतीने आरोग्यसेवा बजावत आहेत.

Video पाहा : अखेर गर्दी पांगविण्यासाठी पाेलिसांना करावा लागला लाठी चार्ज

कमी कर्मचारी संख्या असूनही त्याबद्दल किंवा एखाद्या अपुऱ्या सुविधेबद्दल कुरकुर न करता लढणाऱ्या या सर्व कोरोनायोध्दा आणि दररोज फिल्डवर काम करणाऱ्या डॉ. उज्वला इंगळे, डॉ. महादेव इंगळे, श्री. वाडकर, श्रीमती भोसले, स्नेहप्रभा नलवडे, राहुल पांढरपोटे, एम. बी. इनामदार, एस. एस. सोनावणे, आर. डी. कुंभार, एच. एम. चव्हाण, श्री. बोबडे, श्री. कदीरे, श्रीमती गायकवाड, के. एल. शिंदे यांच्यासह आशा स्वयंसेविका अशा सर्वच आरोग्यदूतांचे परिसरात कौतुक होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale