esakal | मलकापूरात गर्दी पांगविण्यासाठी पाेलिसांनी केला लाठी चार्ज

बोलून बातमी शोधा

Malkapur
अखेर गर्दी पांगविण्यासाठी पाेलिसांना करावा लागला लाठी चार्ज
sakal_logo
By
राजेंद्र ननावरेे

मलकापुर (जि. सातारा) : कराड नजीकच्या मलकापुर शहरातील एका फर्निचर शोरूमला आग लागली. आज (गुरुवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुणे बंगळूर आशियाई महामार्ग लगत असलेल्या लाेटस शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच धूराचे लाेट माेठ्या प्रमाणात दिसू लागल्यानंतर नागरिकांना त्या ठिकाणी धाव घेतली.

कार्यकर्त्याच्या हाकेनंतर नेत्याने पाेचविले रेमडेसिव्हर

तेथूनच काहींनी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला फाेन केले. आगीने राैद्र रुप धारण केल्याने धूराचे लाेट माेठ्या प्रमाणात पसरले. यामुळे महामार्गासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. पाेलिस देखील घटनास्थळी पाेचले. आकाशात उंचीपर्यंत धुराचे लोट पसरले होते. आग पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढली.

अखेर गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. लोटस फर्निचरच्या शाेरुमधील सारे साहित्य आगीत बेचिराख झाले आहे. ही आग कशामुळे लागली आणि आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती तूर्तास मिळू शकली नाही.

चर्चा तर हाेणारच; भागवत कुटुंबियांनी घातले 'स्टेला'चे डाेहाळ जेवण

मोदींच्या वल्गना त्यांच्याच अंगलट; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात