esakal | कोरेगाव, फलटण, खंडाळा, खटाव हॉट्‌स्पॉट; कऱ्हाडात 9 मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona dead body

कोरेगाव, फलटण, खंडाळा, खटाव हॉट्‌स्पॉट; कऱ्हाडात 9 मृत्यू

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक दोन हजार 256 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 42 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक हजार 444 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाधित व मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्हावासियांसाठी चिंताजनक ठरत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. ऑक्‍टोबरनंतर कोरोनाचे मृत्यू व बाधितांची संख्या आटोक्‍यात आली होती. मात्र, जानेवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र, मागील महिनाभरात बाधित व मृत्यूंच्या संख्येने कहर केला आहे, तसेच अद्यापही मृत्यू सत्राची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गुरुवारी सर्वाधिक दोन हजार 256 अधिक बाधित सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनता कर्फ्यू लागू केला असून, गावाबाहेरील लोकांना गावबंदी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण, खंडाळा, खटाव ही तालुके हॉट्‌स्पॉट झाली असून, या ठिकाणी प्रशासन सतर्क झाले झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

सर्वाधिक मृत्यू कऱ्हाड तालुक्‍यात

कोरोनाने जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक 9 मृत्यू कऱ्हाड तालुक्‍यात, तर सातारा तालुक्‍यात 8 मृत्यू झाले आहेत, तसेच सातारा तालुक्‍यात सर्वाधिक बाधित 477, तर सर्वात कमी 46 बाधित महाबळेश्‍वर तालुक्‍यात आढळून आले आहेत.

कऱ्हाडात वादळी वाऱ्यासह 'मुसळधार'; ऑक्‍सिजन लेव्हल कमी होऊन रुग्णांना धाप

खटावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या अक्षरशः रांगा

कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीशी संबंध; पुण्यातील 14 जणांना वाईत अटक