esakal | खटावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या अक्षरशः रांगा

बोलून बातमी शोधा

Corona Center
खटावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या अक्षरशः रांगा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंध (सातारा) : खटावच्या कोरोना सेंटरमध्ये नियंत्रण कक्षाच्या दुर्लक्षामुळे कोरोना चाचणीसाठी अक्षरशः कर्मचारी व लोकांना तीन-चार तास उन्हामध्ये थांबावे लागत असल्याने लहानांसह वृद्धांचे हाल होत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

खटाव येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये सुरू असलेल्या सेंटरमध्ये अधिकारी व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सुविधांअभावी नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. "कोरोना' हद्दपार करण्यासाठी की कोरोना वाढविण्यासाठी हे सेंटर सुरू केले आहे? असा सवाल लोकांमधून व्यक्त होत आहे. या सेंटरमध्ये पाच डॉक्‍टर, सात सिस्टर, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक डाटा ऑपरेटर व चार वॉर्डबॉय असे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत.

सातारकरांनाे! काळजी घ्या, घाबरु नका; आलाय नवा आदेश

मात्र, कोरोना चाचणी परीक्षणासाठी रॅपिड टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी तीन ते चार कर्मचारी लागतात. मात्र, खटावच्या या सेंटरमध्ये एकच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य कर्मचारी नेमल्याने तपासणीचे काम संथगतीने सुरू आहे. तपासणी चाचणीसाठी सावली करण्याऐवजी बाहेर मोटारसायकल स्टॅन्डमध्ये अर्धवट उन्हामध्ये सुरू ठेवल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सावलीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Video पाहा : अखेर गर्दी पांगविण्यासाठी पाेलिसांना करावा लागला लाठी चार्ज

जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी मंडप घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. होमगार्डसोबत एक पोलिस कर्मचारी पूर्ण वेळ ठेवण्याचीही मागणी केली आहे.

- डॉ. युनुस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव

Edited By : Balkrishna Madhale