esakal | ठाण्यातील अधिकाऱ्यावर भ्याड हल्ला; वाईत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

satara

ठाण्यातील अधिकाऱ्यावर भ्याड हल्ला; वाईत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (सातारा) : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वाई पालिकेतील कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. यावेळी संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले.

हेही वाचा: काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्यामुळे काहीच फरक पडत नाही- विश्वजीत कदम

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ अधिकाऱ्यांचे नाही तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर जलद गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेचा निषेध म्हणून आज वाई नगरपालिकेचे संपूर्ण कामकाज बंद करण्यात येत आहे. यामध्ये सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाने सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा: बैलगाडी शर्यतीचा सराव केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

या निवेदनावर कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, अभिजित ढाणे, रोशन गायकवाड, अनंत भारस्कर, राजेंद्र जाधव, सचिन धेडे, दीपाली साबळे, क्रांती वाघमळे आदी विभागप्रमुखाच्या सह्या आहेत.

loading image
go to top