Action street vendors : साताऱ्यात पथविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा, फलकांसह साहित्य जप्त; वाहतूक शाखेचा पुढाकार
Satara News : राजवाडा, राजपथ, मोती चौक तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील दुकानांसमोर मांडलेले साहित्य जप्त करण्यासह रस्त्यावरील हातगाड्या आणि पथाऱ्या हटविण्यात आल्या. सूचना करूनही साहित्य न हटवणाऱ्या अनेकांचे साहित्य देखील वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त केले.
सातारा : शहरातील मुख्य रस्त्यांलगत पथारी टाकून तसेच पदपथांवर अतिक्रमणे करत व्यवसाय थाटणाऱ्यांवर सोमवारी सातारा शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. कारवाईदरम्यान हातगाडे, साहित्य, फलक जप्त करण्यासह दंडही केला जाणार आहे.