साताऱ्यात उद्या फुटणार आंदाेलनाचा फटाका! विक्रेते आक्रमक

साताऱ्यात उद्या फुटणार आंदाेलनाचा फटाका! विक्रेते आक्रमक
Updated on: 

सातारा : दिवाळी आठ दिवसांवर आली असली, तरी फटाके विक्री अथवा बंदीबाबतचा कोणताही ठोस निर्णय जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही. जिल्हा प्रशासनाने कोणताही निर्णय जाहीर न केल्यामुळे फटाके विक्रेते हवालदिल झाले असून, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर विक्रीसाठी आणलेल्या लाखो रुपयांच्या फटाक्‍यांचे करायचे काय? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. प्रशासन कोणतीही भूमिका जाहीर करत नसल्याने फटाका विक्रेते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
 
नवीन कपडे, फराळ आणि फटाके हे दिवाळीची त्रिसूत्री आहे. यापैकी कपडे खरेदी करण्याची आणि फराळाची तयारी घरोघरी सुरू आहे. या दोन बाबींची तयारी अंतिम टप्प्यात आल्यानंतर वेध लागतात ते फटाके खरेदीचे. आठ दिवसांवर दिवाळी आली असलीतरी जिल्हा प्रशासनाच्या अंतराळी भूमिकेमुळे साताऱ्यातील फटाका मार्केटमध्ये स्मशान शांतता पसरली आहे. देशव्यापी लॉकडाउनचा फटका शिवकाशी येथील फटाका उत्पादनालासुद्धा बसला आहे. लॉकडाउन शिथिल करत शासनाने दिलेल्या आदेशानुसार इतर व्यवसायांप्रमाणेच शिवकाशी येथील फटाके कारखाने सुरू झाले. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी गरजेइतके उत्पादन त्याठिकाणी झालेले नाही. दिवाळीचा हंगाम लक्षात घेत सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांनी सुद्धा दर वर्षीप्रमाणे त्याठिकाणाहून फटाके मागविले. हे फटाके सध्या जिल्ह्यातील फटाका व्यावसायिकांच्या गोदामात पडून आहेत.

औंध : आजी- माजी सैनिक संघटनेचा स्टेट बॅंकेस टाळे ठोकण्याचा इशारा
 
फटाके आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे परवानगी काढून स्टॉल उभारणीची तयारी सुरू केली. जिल्हा प्रशासनाने शासनाने केलेल्या एका आवाहनाच्या आधारे फटाका विक्रीची परवानगी मागणारे अर्ज निकाली न काढता, तसेच फायलीमध्ये ठेऊन देणे सुरू केलेले आहे. अर्जावर कार्यवाही होत नसल्याने संपर्क साधला असता फटाका विक्रेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच इतर ठिकाणाहून कोणतेही ठोस उत्तर देण्यात येत नाही. सातारा येथे फटाका विक्री परवाने देणे बंद असलेतरी इतर ठिकाणी मात्र आलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्यांकडे पाठविण्याचा सपाटाच सुरू आहे. दाखल अर्जांचा आधार घेत जिल्ह्यातील कऱ्हाड, कोरेगाव, मेढा व इतर भागांत फटाका स्टॉल उभे राहिले असून, त्याठिकाणाहून विक्री सुद्धा सुरू आहे.

केशरी कार्डधारकांसाठी गुड न्यूज; दिवाळीत मिळणार स्वस्तात गहू, तांदूळ  
 
सातारा येथील फटाका विक्रेत्यांना एक न्याय आणि इतर ठिकाणच्या विक्रेत्यांना दुसरा न्याय देण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाची भूमिका अंतराळी असल्याचे समोर येत आहे. या अंतराळी भूमिकेमुळे साताऱ्यातील फटाके विक्रेत्यांना लाखो रुपयांचा फटका बसत असून, ते हवालदिल झाले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन 

दिवाळीत प्रदूषण पातळी वाढते हे शासनाच्या यापूर्वी का लक्षात आले नाही. प्रदूषण वाढते तर यापूर्वीच फटाक्‍यांवर बंदी घालणे आवश्‍यक होते. दिवाळी आठ दिवसांवर आली आहे, लाखो रुपयांचे फटाके गोदामात पडून आहेत. त्या फटाक्‍यांचे करायचे काय असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे. याच अनुषंगाने आम्ही प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्व फटाका विक्रेते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती फटाका स्टॉल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Woman Jyoti Shelar Inspiring Education Journey DEd BA MA and Her Determination to Fulfill Fathers Dream
karad ganpati visarjan
Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Marathi News Esakal
www.esakal.com