
मोरांच्या शिकारप्रकरणी एक गजाआड
कऱ्हाड : तब्बल २० लांडोरांसह मोरांची शिकार करणाऱ्या एकाच्या विभागाने मागील आठवड्यात मुसक्या आवळल्या. गोरख राजेंद्र शिंदे (वय ३२, सध्या रा. कृष्णा कारखाना परिसर, मूळचा रा. इटकुर, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव होते. मोराच्या शिकारीला वापरलेल्या फासकी बार्शीत खरेदी केल्याचे समोर आले. वन विभागाने काल (ता. ९) रात्री बार्शी शेतकरी सेवा केंद्र व कापड बाजारावर छापा टाकला. त्या वेळी तेथे विक्रीस ठेवलेल्या लहान- मोठ्या तब्बल ६५ फासक्या जप्त झाल्या आहेत. आनंद दिनकर रुद्राके (रा. बार्शी, जि. सोलापूर) यास अटक झाली आहे. त्याला न्यायालयाने वन कोठडी सुनावली आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात आटके येथे मोराची शिकार करणाऱ्यास गोरख शिंदेला वन विभागाने रंगेहात पकडले. त्या कारवाईत सहायक वनसंरक्षक झांजुर्णे यांच्यासह वनपाल ए. पी. सवाखंडे, रामदास घावटे, बी. सी. कदम, वनरक्षक रमेश जाधवर, सुनीता जाधव, आश्विन पाटील, उत्तम पांढरे, शंकर राठोड, जयवंत काळे यांनी सापळा रचला. कृष्णा नदीलगतच्या खटकुळी ते सावराई मळीच्या शिंदेला दोन मोर आणि सात लांडोर शिकार करताना पकडले. तो सध्या कोठडीत आहे. त्याने २० मोरांच्या शिकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिकारीला वापरत असलेल्या फासकी या बार्शीतून आणल्याचे सांगितले.
त्यानुसार वन विभागाने बार्शीत तपास केला. तेथील शेतकरी सेवा केंद्रावर छापा टाकला. त्या वेळी तेथे वन्य श्वापदांसह मोर किंवा अन्य पक्ष्यांच्या शिकारीला वापरण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या तब्बल ६५ फासक्या जप्त केल्या. त्यात आनंद रुद्राकेला अटक केली आहे.
Web Title: Crime Case Of Peacock Hunting One Arrested Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..