खासदार उदयनराजे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका; साताऱ्यात 'पेटिंग'वरून मोठा वाद I Satara Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितलं. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

Satara Police : खासदार उदयनराजे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका; साताऱ्यात 'पेटिंग'वरून मोठा वाद

सातारा : साताऱ्यातील पोवई नाकामधून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या कार्यकर्त्यांना सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतलंय. एका इमारतीवर उदयनराजे यांचे पेटिंग काढण्याचं काम सुरु होतं.

त्याला लोकप्रतिनिधींचा विरोध असल्यामुळं पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचं समजतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या निवासस्थानानजीक (Koyna Daulat Niwas) खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्यानं पेटिंग काढण्यात येणार होतं.

मात्र, सातारा पोलिसांनी हे पेटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यानं काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. या पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितलं. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्यानं तणाव निर्माण झाला आहे.