esakal | साताऱ्यात दिवसाढवळ्या दगडाने ठेचून एकाचा खून I Satara
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
दिव्यनगरी परिसरात एकाचा दगडाने मारहाण करून खून

साताऱ्यात दिवसाढवळ्या दगडाने ठेचून एकाचा खून

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : शाहूपुरी हद्दीतील दिव्यनगरी परिसरात आज सकाळी एकाचा टोळीने दांडके व दगडाने मारहाण करून खून केला आहे. संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय ४५, रा. दिव्यनगरी) असे या हल्ल्यात मृत झालेल्याचे नाव आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास दिव्यनगरी परिसरातून ते जात होते. या वेळी रस्त्यात अडवून त्यांना दांडकी व दगडाने मारहाण करण्यात आली.

मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी झाल्यानंतर मारहाण करणारे निघून गेले. त्यानंतर सुळ यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रक्तस्त्राव व जोराने मारहाण झाल्यामुळे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालुका व शाहूपुरी पोलिस ठाण्याचे (Shahupuri Police Station) अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा: 14 वर्षापूर्वी ज्यानं वाचवलं, त्याच्याच कुशीत गोरिलानं सोडला अखेरचा श्वास

घटनास्थळावरून हल्याची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी पंचनाम्याला सुरवात केली. तसेच संशयितांच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली. पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारीही या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत आहेत. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक देवाण-घेवाणीचा वाद तसेच जमिनीच्या कारणातून हा खून झाला असल्याचे समोर येत आहे.

loading image
go to top