14 वर्षापूर्वी ज्यानं वाचवलं, त्याच्याच कुशीत गोरिलानं सोडला अखेरचा श्वास I Mountain Gorilla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mountain gorilla

तुम्हाला माउंटन गोरिलाबद्दल (mountain gorilla) माहित असेलच, तोच गोरिला जो पार्कमध्ये रेंजरसोबत सेल्फी घेतल्यानंतर जगभरात प्रसिध्द झाला.

14 वर्षापूर्वी ज्यानं वाचवलं, त्याच्याच कुशीत गोरिलानं सोडला अखेरचा श्वास

तुम्हाला माउंटन गोरिलाबद्दल (mountain gorilla) माहित असेलच, तोच गोरिला जो पार्कमध्ये रेंजरसोबत सेल्फी घेतल्यानंतर जगभरात प्रसिध्द झाला. मात्र, तो आता या जगात राहिला नाही. 14 वर्षीय गोरिलाचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. Ndakasi नावाचा हा माउंटन गोरिला 2019 मध्ये फॉरेस्ट रेंजरसोबत सेल्फी घेतल्यानंतर जगभरात लोकप्रिय झाला होता. ही 'सेल्फी' सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती.

इन्स्टाग्रामवर जारी केलेल्या निवेदनाद्वारे, अधिकार्‍यांनी ही दु:खद बातमी दिलीय. ही बातमी सांगताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. 'नदाकासी'च्या अशा अचानक जाण्यानं आमचं अनाथाश्रम पोरकं झालंय. नदाकासीच्या मृत्यूची ही खबर जगासाठी खूपच दु:खद आहे. नदाकासी एक दशकाहून अधिक काळ आमच्या सेनक्वेवे केंद्रात राहत होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा: कॅलिफोर्नियात दुष्काळाच्या झळा; पाण्यासाठी घेतायत दीड कोटींचे मशीन

नदाकासीनं त्याचा केअरटेकर आणि जीवलग मित्र आंद्रे बाउमाच्या मांडीवर आपला प्राण सोडलाय. बाउमा यांनी 2007 पासून नदाकासीची काळजी घेतलीय. मात्र, ती साथ आता कायमची तुटलीय. जेव्हा रेंजरांना नदाकासी तिच्या मृत आईच्या मृतदेहावर पडलेला आढळला. तेव्हा रेंजर्सनी नदाकासीला अनाथाश्रममध्ये आणले होते. नदाकासी जंगलात परतण्यासाठी खूपच अशक्त होता, त्यामुळे त्याला अनाथ माउंटन गोरिला केंद्रात आणण्यात आलं.

हेही वाचा: याला म्हणतात यश! घरोघरी दूध वाटणारा मुलगा बनला CA

अशा प्रेमळ प्राण्याचं समर्थन करणं आणि त्यांची काळजी घेणं हा विशेषाधिकार होता, असं रेंजर्सनी सांगितलं. अगदी लहान वयातच नदाकासीचं दुःख त्यांनी जाणून घेतलं, असं बाउमा यांनी निवेदनात म्हटलंय. तो पुढे म्हणाला, नदाकासीचा गोड स्वभाव आणि बुद्धिमत्ता त्याला वानरांशी जोडण्यास मदत केली. मला नादाकासीला माझा मित्र म्हणण्यात अभिमान वाटतो. मी त्याच्यावर लहान मुलाप्रमाणं प्रेम केलंय, त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हास्य फुललंय, असंही बाउमांनी सांगितलं. नदाकासी सोशल मीडियावर व्हायरल होण्याआधी, अनेक टीव्ही शोमध्ये त्याला दाखवण्यात आलं होतं. 'विरुंगा' नावाच्या माहितीपटाचाही तो एक भाग होता.

टॅग्स :mountain gorilla