
तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी रहिमतपूरच्या युवकावर गुन्हा दाखल
सातारा : महाविद्यालयात आलीस तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी एक तरुणीला दिल्याप्रकरणी युवकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सोहन संतोष चव्हाण (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे युवकाचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. शहरातील एका महाविद्यालयामध्ये ती तरुणी बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सोमवारी (ता. २३) दुपारी सव्वाचारच्या सुमारास ती महाविद्यालयात गेली होती.
महाविद्यालयातील लॅबमध्ये असताना त्या वेळी सोहन तेथे गेला. लॅबमधून हाताने खुणावून त्याने तिला बाहेर बोलावले. ‘तू खूप छान दिसतेस. मला आवडतेस; पण तू कोणाबरोबर बोलू नकोस,’ असे म्हणून त्याने तिच्या अंगाला स्पर्श केला. त्या वेळी ‘मला हात लावू नको,’ असे ती म्हणाली. त्यावरून चिडून त्याने तिच्या गालावर चापट मारली, तसेच मांडीवर लाथ मारली. त्यानंतर ‘तू पुन्हा महाविद्यालयात आलीस तर मी तुला जीवे ठेवणार नाही,’ अशी धमकीही त्याने दिली.
या प्रकारामुळे तरुणी घाबरली. त्यामुळे तिने हा प्रकार लगेच कोणाला सांगितला नाही. मात्र, जर तक्रार केली नाही, तर त्याचा पुन्हा त्रास होर्इल म्हणून धाडस करून तिने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर सोहनवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News Rahimatpur Youth Charged Of Threatening Young Woman Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..