
सातारा : करंजे परिसरातील एका फ्लॅटमधून टिव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर चोरल्याप्रकरणी दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. किरण बबन भोसले (वय 22, रा. करंजे पेठ) व रमेश विष्णू सुतार (रा. शाहूपुरी) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती.
त्या वेळी तेथे त्यांना संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले होते. त्यामध्ये असलेल्या व्यक्तींचा ते शोध घेत. शोधा दरम्यान संशयित करंजे येथील भैरवनाथ पटांगण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून चोरीला गेलेला टिव्ही हस्तगत केला आहे. हवालदार अमर काशीद तपास करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हवालदार लैलेश फडतरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार व पंकज मोहिते यांनी ही कारवाई केली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.