
सातारा : भरदिवसा शिरवळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
शिरवळ : येथील महावितरण मध्ये कार्यरत असलेले अधिकारी यांचे बंद फ्लॅटचे कुलुप तोडून एकुण अंदाजे तीन लाख ८१ हजार ५९४ रुपयाचे अंदाजे १० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले तर याच बरोबर येथील मंडाईकॉलनी व पवारवस्ती येथे ही बंद फ्लॅट मधील कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली मात्र यातील किती मुद्देमाल गेला? याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालु होते . एकाच दिवशी तीन बंद फ्लॅट फोडुन चोरट्यांनी भरदिवसा शिरवळ मध्ये धुमाकुळ घातल्याची घटना घडली . यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले की, शिरवळ येथील प्रकृती टावर्स येथे राहत असलेल्या राहुल तुळशीराम कुरहाडे हे विद्युत अभियंता कामावर गेले असता त्यांच्या बंद घराचे भरदिवसा फ्लॅट फोडून साडेतीन लाख रुपयांचे दहा तोळे किंमतीचे सोन्याचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. यामध्ये अंदाजे ४३ .८ ग्रॅमचे मनी मंगळसूत्र १२. ४०० ग्रॅम चे ब्रेसलेट, अंगठी. पेंडल व इतर सोन्याचे डाग असे एकूण अंदाजे दहा तोळे सोन्याचे दागिने, याचे अंदाजे किंमत तीन लाख 81 हजार 594 रुपये मुदेमाल या चोरीच्या घटनेत लपांस केले आहे.
तसेच शिरवळ येथील मंडाई कॉलनी येथील ओंकार रेसिडेन्सी येथील दताराम राणे तर पवार वस्ती येथील योगेश लेले यांचे ही बंद फ्लॅट फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली .मात्र या घटनेतील माहिती गोळा करायचं काम शिरवळ पोलीस रात्री उशिरापर्यत करत होते.या घटनेची फिर्याद राहुल तुळशीराम कुरहाडे (वय ३३)( सध्या राहणार प्रकृती टावर्स, शिरवळ यांनी शिरवळ पोलीसात दिले असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहे.
- आशपाक पटेल