
कऱ्हाड: येथील कोयना नदीपात्राकडेला तीन आठवड्यापासून मगरीचे वास्तव्य आहे. त्यामुळे नदीला पोहायला जाणाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. आज दुपारी गोटे गावच्या परिसरातील नदीकाठावर मगरीचे पुन्हा दर्शन झाले. त्यामुळे तिची धास्ती कायम आहे. दरम्यान, वन विभागाने मगरीपासून संरक्षणासाठी काय करावे, यासंदर्भात आज नदीकाठी पोहायला जाणाऱ्यांसह नागरिकांत जनजागृती केली. त्याचबरोबर जनजागृतीचा फलकही लावला.