फसवणाऱ्या दोघांकडून कोट्यवधींची वाहने जप्त

हप्ते थकलेल्या २५ चारचाकींची परस्पर विक्री
crore of vehicles seized from two scammers satara crime
crore of vehicles seized from two scammers satara crime sakal
Updated on

सातारा : महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील फायनान्स कंपन्यांचे हप्ते थकलेल्या ट्रक व अन्य वाहनांच्या मालकांना फसवणाऱ्या दोघांकडून शहर पोलिसांनी १४ ट्रकसह तब्बल दोन कोटी ६५ लाख रुपये किमतीची २५ वाहने जप्त केली आहेत. या दोघांकडून आणखी वाहने मिळण्याची शक्यता आहे. फसवणुकीचा आंतरराज्य गुन्हा उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आले. उन्मेश उल्हास शिर्के व अब्दुल कादीर सय्यद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याविषयी माहिती दिली.

एकंबे (ता. कोरेगाव) येथील सचिन बजरंग चव्हाण यांनी इंडी स्टार कॅपिटल फायनान्स कंपनीकडून कर्जाने दहाचाकी ट्रक घेतला होता. त्याचे हप्ते थकले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या एजंटच्या ओळखीने त्यांनी उन्मेश उल्हास शिर्के (रा. नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) याला थकीत हप्ते भरण्याच्या हमीवर काही पैसे घेऊन त्यांनी चालवायला दिला. परंतु, त्याच्याकडून ट्रकचे हप्ते भरले गेले नाहीत. त्यामुळे चव्हाण यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हप्तेही थकल्याने व ट्रकही परत मिळत नसल्याने चव्हाण यांनी शिर्केवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तपासात अब्दुल कादीर सय्यद (रा. सुपा, जि. नगर) याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. पुढील तपासामध्ये महाराष्ट्रासह गुजरातमधील अनेक नागरिकांना या टोळीने गंडा घातला असल्याचे समोर आले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शहर पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक समीर कदम व पथकाने तपासाचे कौशल्य पणाला लावले. त्यामध्ये दोन्ही संशयितांनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, नगर, बीड, औरंगाबाद, बुलडाणा, पनवेल, ठाणे, रायगड, सांगली हे जिल्हे व गोवा तसेच गुजरात राज्यांतील अनेकांना अशाच प्रकारे फसवले असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी १४ ट्रक, सात छोटे टेंपो, तीन जीप व कार अशी एकूण २५ वाहने राज्यातील ठिकठिकाणांहून हस्तगत केली. अजूनही १५ ते २० वाहने ताब्यात घेण्याचे शहर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत संशयितांनी केवळ जिल्ह्यातच चार ते पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

अधीक्षक बन्सल, अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार राहुल घाडगे, सुजित भोसले, दीपक इंगवले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांचा कारवाईत सहभाग होता.जिल्ह्यात अशा पद्धतीने अनेक वाहनचालकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. त्यांनी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन श्री. बन्सल यांनी केले आहे.

पोलिस अधीक्षकांकडून शहर पोलिसांना बक्षीस

अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची २५ वाहने जप्त करत मोठा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले आहे. या कामगिरीसाठी त्यांना त्यांनी ३५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com