श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी शहर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
"Shree Siddhnath Rathotsav in Dahivadi is celebrated with immense joy, as devotees toss gulal and coconuts, offering note garlands and shouting 'Jayghosh' in devotion, marking a vibrant festival."Sakal
दहिवडी : येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात झाला. यावेळी ‘नाथाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करण्यात आला, तसेच गुलाल- खोबऱ्याची उधळण करण्यात आली. रथोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती.