दहिवडी : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी (Farmer), गोरगरीब जनता धाय मोकलून रडत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब जनतेच्या पाठीशी सरकार, प्रशासन ठामपणे उभे आहे, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आजच्या नुकसान पाहणी दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा. मागील आठवड्यात माण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. घरांसह शेती, रस्ते, पूल यांची मोठी हानी झाली. या नुकसानीची प्रातिनिधिक पाहणी मंत्री गोरे यांनी केली.