esakal | फक्त 48 तासात दहिवडी पोलिसांनी उघड केला अपहरणाचा बनाव
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

फक्त 48 तासात दहिवडी पोलिसांनी उघड केला आहे.

फक्त 48 तासात दहिवडी पोलिसांनी उघड केला अपहरणाचा बनाव

sakal_logo
By
रुपेश कदम :

दहिवडी (सातारा): आपल्या दाजीच्या कापड दुकानात काम करायचे नसल्यामुळे व दाजीला अद्दल घडवावी, या हेतूने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केलेल्या तरुणाला पकडून अपहरणाचा बनाव फक्त ४८ तासात दहिवडी पोलिसांनी उघड केला आहे.

हेही वाचा: जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

याबाबतची माहिती अशी, शहरात रामदेव कलेक्शन हे प्रकाश सावळारामजी पुरोहित यांचे कापड दुकान आहे. याच दुकानात त्यांचा मेव्हणा विक्रम मिश्रीमल पुरोहित (वय 23 वर्षे) हा काम करतो. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता विक्रम हा चहा पिऊन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. काही वेळाने विक्रमने प्रकाश यांना फोन करुन सांगितले काही अनोळखी व्यक्ती मला चाकूचा धाक दाखवून पकडून घेवून चालले आहेत. त्यानंतर तत्काळ प्रकाश पुरोहित यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात येवून विक्रम पुरोहित यास पळवून नेल्याची तक्रार दिली. तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून तपासाला गती देण्यात आली.

हेही वाचा: दहिवडी-नातेपुते मार्गावर मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक

अपहरण झालेला विक्रम हा अधूनमधून त्याच्या मोबाईलचा वापर करत होता. मोबाईलच्या प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दयानंद तुपे, सहायक पोलिस फौजदार पी. जी. हांगे, पोलिस नाईक आर. एस. बनसोडे यांनी विक्रम यास कामोठे (नवी मुंबई) परिसरात शोध घेवून गुन्हा नोंद झाल्यापासून ४८ तासांच्या आत ताब्यात घेतले.

विक्रम यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले दाजी प्रकाश पुरोहित यांचे दुकानात काम करावयाचे नसल्याने व त्यांना अद्दल घडवावी या हेतूने स्वतःच अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली.

हेही वाचा: दहिवडी नगरपंचायत इमारतीस लागली आग

गुन्हेगारांना शोधून काढणारा दहिवडी पोलिसांचा हुकमी एक्का

अपहरणाचा बनाव केलेला विक्रम हा गुंगारा देत असल्याने व सापडत नसल्याने शोध मोहिमेतील सहकारी हतबल झाले तरी पोलिस नाईक आर. एस. बनसोडे यांनी विक्रमला शोधल्याशिवाय थांबायचे नाही असा निश्चय केला होता. त्यानुसार त्यांनी आपले सर्व नेटवर्क वापरुन पहाटेच्या सुमारास विक्रमला ताब्यात घेतलेच. यापुर्वी सुध्दा जनावरे चोरी प्रकरण असो वा नरवणे प्रकरणातील आरोपी, प्रत्येक गुन्ह्याची उकल करण्यात आर. एस. बनसोडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

loading image
go to top