esakal | महाबळेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले; स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान I Mahabaleshwar
sakal

बोलून बातमी शोधा

Strawberry Crop

दानवली, भोसे, भिलार परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.

महाबळेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले; स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यातील (Mahabaleshwar Taluka) दानवली परिसरात कोसळलेल्या धुवांधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः हंगामाच्या पूर्वार्धातच स्ट्रॉबेरी (Strawberry Crop) उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेय. काल या गावात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने स्ट्रॉबेरी लागवड केलेल्या शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक विवंचनेत पडलेला शेतकरी कोलमडून गेलाय.

याबाबत अधिक माहिती अशी, की काल दुपारनंतर दानवली, भोसे, भिलार परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. या परिसरात सध्या स्ट्रॉबेरी लागवड चालू असून अचानक आलेल्या पावसाने स्ट्रॉबेरीच्या शेतात तळी साचली आहेत. त्यामुळे अथक कष्ट आणि आर्थिक सामना करीत मिळवलेली रोपे या पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. आता रोपे गेल्याने शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला असून पुन्हा नवी रोपे खरेदीसाठी धावाधाव करावी लागणार आहे आणि ती मिळतील की नाही याचीही शाश्वती नसल्याने हा शेतकरी पुरता हडबडून गेला आहे.

हेही वाचा: साताऱ्यात वनविभागाची धाड; 4 लाखांच्या इंद्रजालासह 80 किलो चंदन, 600 मोरपीस जप्त

आज गावातील बाबुराव दानवले, सूर्यकांत दानवले, आनंदा दानवले, बबन दानवले, दत्तात्रय दानवले, पांडुरंग दानवले, अशोक दानवले, महादेव दानवले, विश्वास दानवले, संतोष दानवले, महादेव धनावडे, हनुमंत दानवले, विजय दानवले, शिवराम बिरामणे, पांडुरंग दानवले, पांडुरंग दानवले, आनंदा दानवले, अर्जुन दानवले, जगन्नाथ दानवले या शेतकऱ्यांनी नुकतीच स्ट्रॉबेरी लागवड केली होती. परंतु, कालच्या पावसात ही स्ट्रॉबेरी शेती पूर्णपणे पाण्यात गेली. त्यामुळे लागवड केलेले पूर्ण क्षेत्र बाद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून कृषी विभागाने यांची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केलीय.

हेही वाचा: तेलबियांचे उत्पन्न घटण्याच्या मार्गावर; पावसाचा पिकांना मोठा फटका

कालच्या पडलेल्या पावसाने आम्ही मोठ्या आशेने लावलेली रोपे पाण्यात गेल्याने आम्हाला आता पुन्हा रोपे घेवून लागवड करावी लागेल, तरच आम्ही टिकणार आहोत. आता केलेला आमचा खर्च पावसाने पाण्यात घालवला असून पुढे रोपे मिळणे अवघड झाल्यास आमचा हंगाम वाया जाणार आहे.

-प्रदीप दानवले, शेतकरी

loading image
go to top