साताऱ्यात वनविभागाची धाड; 4 लाखांच्या इंद्रजालासह 80 किलो चंदन, 600 मोरपीस जप्त

Satara Forest Department
Satara Forest Departmentesakal
Summary

सातारा शहरात वनविभागाकडून (Satara Forest Department) मोठी कारवाई करण्यात आलीय.

कोंडवे (सातारा) : सातारा शहरातील 162 सदाशिव पेठमधील श्रीदत्त पूजा भांडारमध्ये सातारा वनविभागाकडून (Satara Forest Department) मोठी कारवाई करण्यात आली. सदर दुकानातून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून धाड टाकली. यात इंद्रजाल अर्थात काळे कोरल (Anthozoa Hexacorollia) ह्या समुद्री प्राण्याचे अवशेष मिळून आले. त्याची 59 इतकी संख्या आहे.

सदरचा मुद्देमाल वन अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला असून श्रीदत्त पूजा भंडारचे मालक संतोष लक्ष्‍मण घोणे यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,43,44, 48, 49,51 अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलीय. जप्त इंद्रजाल मालाची किंमत अंदाजे चार लाख रुपये इतकी असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच दुकानाची अधिक झडती घेतली असता, तेथे चंदनाचे तुकडे व मोरपीसेही सापडली. वनाधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडतीमध्ये या दुकानातून चंदनाचे 80 किलो तुकडे व 600 मोरपिसेही जप्त करण्यात आली. ह्या वस्तू बाळगणे व विकणे वनकायद्याने गुन्हा आहे.

Satara Forest Department
शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका : उदय सामंत

दरम्यान, तत्सम प्रकारचा मुद्देमाल कोणी बाळगत असेल अथवा विक्री करत असेल, तर त्याची खबर वनविभागास द्यावी, असे आवाहनही वनअधिकाऱ्यांनी जनतेस केले आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वनक्षेत्रपाल सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनपाल कुशल पावरा, प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले, साधना राठोड, राज मोसलगी, अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, वाहन चालक सुरेश गभाले, संतोष दळवी यांनी केलीय.

Satara Forest Department
'निवडणुकीत तिकीट फिक्स समजू नका; आता पॅरामीटर लावूनच तिकीट'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com