esakal | महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Strawberry

महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान

sakal_logo
By
सुनील कांबळे

भिलार (सातारा) : पाचगणीसह महाबळेश्वर परिसरात आज दुपारी गारांचा मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

आज दिवसभर आभाळ भरून आले होते. मात्र, दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाली. काही वेळात गारांसह मुसळधार पाऊस झाला. पाणीच पाणी करणारा हा पाऊस सुमारे दीड ते दोन तास चालू होता. भिलार परिसरात झालेल्या पावसाने स्ट्रॉबेरी व फराशीचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'

स्ट्रॉबेरीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असला, तरी असणाऱ्या उत्पादनावर परिणाम जाणवणार असून, पुढे येणाऱ्या पिकावरही याचा परिणाम होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale

loading image