esakal | लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'
sakal

बोलून बातमी शोधा

Tanker Water Supply

लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'

sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (सातारा) : हस्तनपूर (ता. माण) ग्रामस्थ व दहिवडी वन विभाग दहिवडी यांच्या वतीने हस्तनपूर येथील 50 हेक्‍टर माळरानावर वनराई प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यात चिंच, करंज, लिंब, शिशू, वड, आवळा आदी विविध प्रकारच्या 31 हजार 250 वृक्षांना चार टॅंकरने नियमित पाणी दिले जात असल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हस्तनपूरची वनराई फुलल्याचे दिसून येत आहे.

हस्तनपूरने लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाच्या बाजूलाच माळरानावर वन विभागाचे 50 हेक्‍टर क्षेत्र आहे. दोन वर्षांपूर्वी माळरानावर 50 हेक्‍टर क्षेत्रात वन विभागाने वृक्षलागवडीचा प्रकल्प हाती घेतला. यात 31 हजार 250 वृक्ष लावण्याची ऐतिहासिक कामगिरी वन विभागाने करून दाखवलेली आहे. वनक्षेत्रपाल एम. पी. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ठोंबरे, सावंत हे ऐन उन्हाळ्यातही वृक्षांची काळजी घेताना दिसून येत आहेत. त्यांना वनकर्मचारी तसेच गावातील संयुक्त वन व्यवस्था समिती व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

FDA चे अधिकारी म्हणतात "आम्हाला काय एवढीच कामे आहेत का?

माळरानावरील या वृक्षांना गावातील स्थानिक टॅंकरमालक आपल्या टॅंकरने नियमित पाणी घालून वृक्षसंगोपनाचे कार्य चोख बजावत आहेत. वन विभागाने या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच वणवा लागला तरी वृक्षांना वणव्याची झळ लागू नये म्हणून वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. माण तालुक्‍यातील हा आदर्शवत वनराईचा प्रकल्प असून, काही वर्षांतच हा लोकांसाठी "पिकनिक पॉइंट' ठरेल.

वाचा शेतक-याची व्यथा; सव्वालाखा ऐवजी 20 हजारच हाती आले

हस्तनपूर वनराई प्रकल्पाचे दोन वर्षांत चांगले संगोपन केले आहे. एक ते दोन वर्षांत पर्यटकांना आकर्षित करणारा हा वनराई प्रकल्प ठरेल. निधीबाबत आमच्यावर काहींनी केलेले आरोप केवळ स्वार्थापोटी असून, या खोट्या आरोपांकडे लक्ष न देता आम्ही वनराईचे काम असेच सुरू ठेवून ग्रामस्थांच्या सहकार्याने एक "आयडियल वनराई' उभारणार आहोत.

-एम. पी. मुळे, वनक्षेत्रपाल, वन विभाग, दहिवडी

शाब्बास! गावच्या पोरांनी करुन दाखवलं; WhatsApp मधून गोळा केली 'आरोग्य'साठी लाखोंची मदत

वनराईतील वृक्षांना टॅंकरचालक नियमितपणे पाणी घालत असून, त्यांच्यावर समिती, वनपाल, वन कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. वेळच्या वेळी पाणी मिळत असल्याने वृक्षवाढ चांगली झाली आहे. पाणीपुरवठ्याचा निधी टॅंकरमालकांना वेळेवर मिळत असून, एवढे मोठे काम वन विभागाने हाती घेतल्याने वनराईत वाहनांना येण्या-जाण्यासाठी टॅंकरमालकांनी स्वखर्चाने कच्चे रस्ते तयार करून घेतले आहेत.

-दादासाहेब मुळीक, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्था समिती, हस्तनपूर

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top