esakal | सावधान! माण नदीवरील पूल देतोय अपघातांना निमंत्रण I Maan River
sakal

बोलून बातमी शोधा

Highway Bridge

माण नदीवरील जुन्या पुलाचे रुंदीकरणाचे काम अपूर्णावस्थेत बंद ठेवण्यात आल्याने हा पूल अपघातांना निमंत्रण देणार ठरतो आहे.

सावधान! माण नदीवरील पूल देतोय अपघातांना निमंत्रण

sakal_logo
By
सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (सातारा) : सातारा-म्हसवड-लातूर महामार्गावरील (Satara-Mhaswad-Latur Highway) येथील माण नदीवरील (Maan River) जुन्या पुलाचे रुंदीकरणाचे काम अपूर्णावस्थेत बंद ठेवण्यात आल्याने हा पूल अपघातांना निमंत्रण देणार ठरतो आहे. महामार्गाच्या कामात हा पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अवाढव्य असा बांधकामाचा खर्च पाहता हाच जुना पूल रुंद करून तो वापरात आण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुलाच्या रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले; परंतु ते कोरोनाच्या लॉकडाउन काळात कधी बंद तर कधी सुरू ठेवण्यात आले. परिणामी अद्यापही या पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असून, सध्या हे काम पूर्णत: बंद ठेवले आहे. पुलाच्या पूर्व व पश्चिम दिशेच्या वाहन प्रवेश टोकास पुलाचे रुंदीकरण पूर्णत: केले गेले नाही. परिणामी एकाच वेळी दोनऐवजी एकच वाहन पुलावर प्रवेश करू शकते. पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंतींचे बांधकाम संबंधित ठेकेदाराने पूर्णच केले नाही व या पुलाचे रुंदीकरण केल्यानंतर पुलावरील संरक्षण भिंतीच्या दोन्ही बाजूस दगड, मुरूम, माती, तसेच ठेवल्यामुळे पुलावरच दीड ते दोन फूट खोलीचे खड्डे पडून त्यामध्ये पडलेल्या पावसाचे पाणी साचून चिखलमय वाहतुकीस धोकादायक रस्ता झालेला आहे.

हेही वाचा: राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

अपूर्ण बांधकामामुळे हा पूल पूर्वीपेक्षा आणखी अरुंद झाला असल्यामुळे एकाच वेळी दोन वाहने समोरासमोरून ये- जा करणे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, या कसरतीत एकमेकांना वाहने घासून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यात गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. या पुलाच्या वाहन प्रवेशाची रस्ते व अपूर्ण ठेवलेले बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

loading image
go to top