esakal | राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला; NCP च्या बड्या नेत्याची खंत I Political
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik-Nimbalkar

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता देऊन बघा, गतीने विकास करून दाखवू.

राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : लोणंद शहरातील (Lonand City) रखडलेले विविध प्रश्न सोडवून शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) एकहाती सत्ता देऊन बघा, गतीने विकास करून दाखवू. नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्यास औद्योगिक वसाहतीमधील बंद पडलेली सोना अलॉईज कंपनीही (Gold Alloys Company) वर्षाच्या आत सुरू करू. लोणंदच्या राजकारणामध्ये यापूर्वी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला. आमदार मकरंद पाटील यांचे काम निश्चितच चांगले असून, हे नेतृत्व जपले पाहिजे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी केले.

लोणंद नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान व दलित विकास योजनेतून एक कोटी ३३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ, १७० पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून रामराजे बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, दयानंद खरात, डॉ. नितीन सावंत, विनोद क्षीरसागर, हणमंतराव शेळके-पाटील, एन. डी. क्षीरसागर, सचिन शेळके-पाटील, शिवाजीराव शेळके- पाटील, भरत शेळके-पाटील, अजय भोसले, सागर शेळके-पाटील, लक्ष्मणराव शेळके-पाटील, अॅड. सुभाषराव घाडगे, दीपाली क्षीरसागर, लीलाबाई जाधव, नंदाताई गायकवाड, योगेश क्षीरसागर, विकास केदारी, रवींद्र क्षीरसागर, राजू खरात, गणिभाई कच्छी, दशरथ जाधव, अॅड. गजेंद्र मुसळे, रोहिणी कानडे, बबलुभाई इनामदार, संभाजीराव घाडगे, राजूभाई कुरेशी, गौरव फाळके, शांतीलाल परदेशी, राजूभाई इनामदार, शफीभाई इनामदार आदी उपस्‍थित होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘पूर्ण बहुमत न मिळाल्याने लोणंदला नगरपंचायत होऊनही गेल्या पाच वर्षांत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण बहुत देऊन बघा, विकासाला गती आल्याशिवाय राहणार नाही. लोणंदचे सर्व प्रश्न आपण पक्षाच्या माध्यमातून सोडवू. दृष्ट लागावी, असा पक्ष वाढायला लागला आहे. मात्र, कोणाचीही दृष्ट लागून देऊ नका.

हेही वाचा: ..अन् नापाक इरादे लाल बहादूर शास्त्रींनी केले उद्ध्वस्त

Lonand City

Lonand City

हाकेच्या अंतरावर शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग व्यक्‍तिमत्त्‍व आपल्याला लाभलेले आहे. ‘कृष्णा’चे पाणी खंडाळा, फलटणला आणून तसेच लोणंद, खंडाळा, फलटण येथे औद्योगिक वसाहती आणून आपले कर्तृत्व सिद्ध करणारे रामराजे, अजितदादा, सुप्रियाताई तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. पक्षाच्या माध्यमातून आपण लोणंद शहराच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागे भक्कम ताकद उभी करा.’’ गेल्या पाच वर्षांत चुकीचा पायंडा पाडून काहींनी गावाला विकासापासून मागे नेले आहे. मात्र, येणाऱ्या पाच वर्षांचा काळ हा लोणंदसाठी सुवर्णकाळ असणार आहे. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व १७ जागा निवडून आणून राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी प्रास्ताविकात केले. सारंग पाटील, दयानंद खरात, विनोद क्षीरसागर, हणमंतराव शेळके-पाटील, सागर शेळके-पाटील यांचीही भाषणे झाली. प्रा. देविदास साळुंखे, प्रा. सुनील शेळके व कय्युम मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज शेळके यांनी आभार मानले.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

loading image
go to top