
कऱ्हाड - भर दुपारी कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. माजी नगराध्यक्षा सौ. उमा हिंगमिरे यांच्या मार्केट यार्ड परिसरातील घरात काल दुपारी चोरी झावी ती घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत उदय हिंगमिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.