
मलकापूर : येथील दत्तनगर परिसरात भरदुपारी एका व्यापाऱ्याच्या घरात शिरून अज्ञात चोरट्याने तब्बल तीन लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत भरत सुखदेव खांडेकर (वय ५१, रा. नूपुर बंगला, दत्तनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांनी दिली.