NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nationalist Congress Party

मोरेंच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी पत्र दिले होते.

NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) खटाव तालुका सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) उमेदवाराच्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. एन. एस. ऊर्फ बंडा गोडसे (Banda Godse) यांनी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली अधिक माहिती अशी, जिल्हा बँक निवडणुकीत एकाच उमेदवाराला वारंवार संधी नको व त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे पक्षाने निमसोडचे युवा नेते नंदकुमार मोरे (Nandkumar More) यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लेखी पत्र दिले होते.

हेही वाचा: 'उदयनराजेंना 'बिनविरोध' करता अन् माझा पराभव, मी दुधखुळा नाही'

Banda Godse

Banda Godse

त्यावेळी पक्षाबरोबर बहुतांशी सोसायटी प्रतिनिधींचे ठराव असल्याची खात्री होती. श्री. मोरे यांनी त्यांच्या ताकदीनुसार चांगली लढत दिली. मात्र, त्यांची उमेदवारी पक्षातील काही लोकांना रूचली नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे मोरे यांचा पराभव झाला. या गोष्टीचा आपणास मनस्वी उबग आला आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

loading image
go to top