
कऱ्हाड: येथील कृष्णा पुलावरून गेल्या आठवड्यात नदीपात्रात उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह आज गोंदी गावच्या हद्दीत आढळला. सकाळी नदीपात्रात तरंगणारा मृतदेह स्थानिकांच्या नजरेस पडल्यानंतर ग्रामस्थांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय २६, वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ जत, जि. सांगली) असे मृत युवतीचे नाव आहे.