Satara Crime: 'दहिवडीनजीक एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला'; जखमीवर उपचार सुरू, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
Dahivadi Shocker: खांडे यांच्या दोन्ही पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर यावेळी झालेल्या झटापटीत प्रसाद साखरे यालाही दुखापत झाली. त्यानंतर प्रसाद साखरे हा स्वतः दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दहिवडी: दहिवडी- फलटण रस्त्यावर खताळवस्तीनजीक एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गंभीर जखमीवर सातारा येथे उपचार सुरू आहेत.