
ढेबेवाडी : सातारा, सांगली, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांतील बैलगाडा शर्यती गाजविलेल्या मालदन (ता. पाटण) येथील वजीर बैलाचा मृत्यू झाला. सर्पदंशाने हा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात नाव असलेल्या वजीरचा मृत्यू त्याच्या चाहत्यांना चटका लावून गेला आहे.