esakal | सैन्यातून सुटीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला; राणंदात प्रशांतचा विहिरीत बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Soldie

सैन्यातून सुटीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला; राणंदात प्रशांतचा विहिरीत बुडून मृत्यू

sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (सातारा) : राणंद (ता. माण) येथील प्रशांत रामहरी घनवट (वय 30) या युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. हा युवक सैन्यात असून, तो सुटीवर आला होता. याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रशांत रामहरी घनवट हा दहा वर्षांपासून सैन्यात कार्यरत आहे. तो ता. 9 एप्रिल 2021 रोजी सुटीवर आला होता. (Death Of Soldier At Ranand Satara News)

काल तो घरातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इनाम नावचे शिवारात विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्या वेळी संजय घनवट हे आपल्या विहिरीवर दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलांना पोहायला शिकवत होते. या दरम्यान प्रशांत घनवट ही त्याठिकाणी पोहण्यासाठी आला होता. त्याने विहिरीच्या पाण्यात उडी मारल्यानंतर तो बुडू लागल्याचे दिसताच संजय घनवट यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पाण्यात बुडाला होता.

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; 'हवामान'चा अंदाज

त्यानंतर संजय घनवट यांनी विहिरीवर येऊन आरडाओरडा करून लोकांना जमा केले. त्यानंतर प्रशांतला पाण्यातून विहिरीच्या काठावर काढण्यात आले. त्या वेळी तो बेशुद्धच होता. त्याला गाडीतून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आणले. मात्र, प्रशांत यास डॉक्‍टरांनी तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. त्याच्या मागे वडील, आई, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार असून, जवानाच्या निधनाने राणंद व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भुजबळ करत आहेत.

Death Of Soldier At Ranand Satara News

loading image