esakal | रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; 'हवामान'चा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; 'हवामान'चा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यात आज पुन्हा एकदा काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील काही भागांत येत्या दोन तासात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे, अशा सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. (Ratnagiri Satara Sangli Kolhapur Latur Will Receive Rain)

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत येत्या दोन-तीन तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामानने दिल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्यांतील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. कालच पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. तत्पूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला होता.

सावधान! मेरुलिंग घाटातून प्रवास ठरतोय जीवघेणा; वाहनांवर कोसळताहेत दरडी

दरम्यान मागील 24 तासात राज्यात बुलढाणा 30, चंद्रपूर १२, महाबळेश्वर २०, पुणे 27 पाशान 22.5 पणजी 11, गोवा व परभणी 6 जालना 3 औरंगाबाद 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, औरंगाबाद ,नागपूर, गोंदिया, पुणे, येथे हलका पाऊस झाला.

Ratnagiri Satara Sangli Kolhapur Latur Will Receive Rain

loading image
go to top