esakal | मृत्यूशी झुंज अखेर थांबली; महाबळेश्वरात नवऱ्याने पेटवून दिलेल्या पत्नीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

दु्र्दैवी घटनेत भाजून जखमी झालेल्या महिलेवर मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात उपचार सुरू होते.

महाबळेश्वरात नवऱ्याने पेटवून दिलेल्या पत्नीचा मृत्यू

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : प्राथमिक शाळेमागील (Mahabaleshwar Primary School) चाळीत 1 सप्टेंबर रोजी नराधम पती राजेंद्र जाधव याने आपल्या पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. या दु्र्दैवी घटनेत भाजून जखमी झालेल्या महिलेवर मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात (Kasturba Gandhi Hospital) उपचार सुरू होते. परंतु, घटनेच्या आठ दिवसांनी या महिलेचा मृत्यू झाला. नुकतेच येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आरोपी असलेला नराधम पती अद्याप मोकाट फिरत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शहरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हॅली व्ह्यू रोडवरील शाळा क्र. 1 च्या इमारती मागील चाळीत राजेंद्र जाधव (वय 55) हा घोडे व्यवसायिक राहत होता. या घोडेवाल्याने 1 सप्टेंबर रोजी सकाळी आपली पत्नी शौचालयावरून परत घरी येत असताना तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिले होते. पत्नीला जळत्या अवस्थेत टाकून हा नराधम पती घटनास्थळावरून पळून गेला होता. चाळीतील रहिवाशांनी प्रसंगावधान राखून त्या महिलेल्या अंगावर पाणी टाकून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशी आणि दुर्दैवी महिलेच्या मुलांनी तिला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सातारा व नंतर मुंबई येथे त्या महिलेला हलविण्यात आले. मुंबई येथे गेली आठ दिवस त्या महिलेची मृत्यूशी झुंज सुरू होती. शेवटी मृत्यूने त्या महिलेला गाठले व आठ सप्टेंबर रोजी ज्या महिलेला उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.

हेही वाचा: योगींच्या राज्यात भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या

मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेचे शव महाबळेश्वर येथे आणण्यात आले. नुकतेच या महिलेवर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी असलेला घोडेवाला राजेंद्र जाधव हा अद्याप महाबळेश्वर पोलिसांच्या हाती लागला नाही. प्रारंभी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके वेगेवगळ्या गावाला पाठविली होती, पंरतु ही तीनही पथके एका दिवसात तपास करून रिकाम्या हाताने परत आली. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी काही खास प्रयत्न केला नसल्याचा आरोप आता शहरातील नागरिक करीत आहेत. हा आरोपी येथील दारूच्या दुकानात आलेला काही लोकांनी पाहिला देखील आहे. महाबळेश्वरच्या आसपासच्या गावात देखील हा आरोपी असल्याचे काही लोक सांगतात, परंतु हा आरोपी पोलिसांना मात्र दिसत नाही. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. पोलिस नाक्यानाक्यावर पर्यटकांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडून हप्ते वसूल करताना दिसतात. मात्र, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुरेसे पोलिसबळ महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नाही. त्यामुळे मुख्यालयाने आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पोलिसांची कुमक महाबळेश्वर पोलिस ठाण्यात (Mahabaleshwar Police Station) तैनात करावी, अशी मागणी महाबळेश्वरातील नागरिक करीत आहेत.

loading image
go to top