esakal | महाबळेश्वर तालुक्यात 27 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mahabaleshwar Crime

महाबळेश्वरपासून 40 कि.मी अंतरावर तालुक्याच्या पश्चिम भागात हातलोट गावाजवळ कासरूड हे गाव आहे.

महाबळेश्वर तालुक्यात 27 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : तालुक्याच्या (Mahabaleshwar Taluka) पश्चिम भागात असणाऱ्या कासरूड गावातील धनेश अशोक चव्हाण या 27 वर्षीय युवकाने राहत्या घरात लोखंडी ॲंगलला नायलाॅन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

महाबळेश्वरपासून 40 कि.मी अंतरावर तालुक्याच्या पश्चिम भागात हातलोट गावाजवळ कासरूड हे गाव आहे. या गावातील धनेश अशोक चव्हाण या युवकाने 8 सप्टेंबरच्या रात्री नायलाॅन दोरीच्या मदतीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याच गावात राहणारा अमित अशोक मोरे यांनी ही खबर 9 सप्टेंबर रोजी शिरवलीचे पोलिस पाटील विलास धोडींराम मालुसरे यांना दिली. पोलिस पाटील मालुसरे यांनी ही खबर कुंभरोशी औटपोस्ट पोलिस ठाण्याचे ए.एस.आय पावरा यांना दिली. पावरा यांनी 10 सप्टेंबर रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात ही नोंद केली आहे.

हेही वाचा: साताऱ्यातील राजे समर्थकांच्या हाणामारीची पोलिस चौकशी करणार?

दरम्यान, या युवकाने आत्महत्या का केली, युवकाच्या घरी कोण होते, त्याचे लग्न झाले होते की नाही, युवकाला इतर कोणी नातेवाईक आहेत का नाही, युवकाचा व्यवसाय काय होता या बाबत महाबळेश्वर पोलिसांनी काही माहिती दिली नाही. तपास केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळतील, मग आम्ही ही माहिती तुम्हाला देवू, असे महाबळेश्वर पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास कुंभरोशीचे पावरा हे करीत आहेत.

loading image
go to top