esakal | साताऱ्यातील राजे समर्थकांच्या हाणामारीची पोलिस चौकशी करणार? हल्ल्यातून निवडणुकीची नांदी!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendraraje-Udayanraje

साताऱ्यात झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

साताऱ्यातील राजे समर्थकांच्या हाणामारीची पोलिस चौकशी करणार?

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : येथे मंगळवारी (ता. सात) झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या (Satara Municipal Election) पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांना (Satara Police Station) ठोस पावले टाकावी लागणार आहेत.

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापली ताकद दाखविण्यासाठी संघर्षाच्या ठिणग्या उडण्याचे प्रकार शहरामध्ये नवीन नाहीत. अनेकदा या कालावधीमध्ये मारामारीचे प्रकार घडल्याचा इतिहास आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यापासून शहरातील या संघटित गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरवात झाली. संदीप पाटील यांच्या कालावधीत खासगी सावकारीतून होणाऱ्या संघटित गुन्हेगारीवर ठोस कारवायांना सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील अनेकांना जरब बसली. त्याचा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठा वाटा राहिला. गुन्हेगारांवर कडक कारवाई होऊ लागल्याने सशस्त्र हल्ल्यांबरोबरच व्यावसायिक व सर्वसामान्यांच्या पिळवणुकीचे प्रमाण कमी येण्यास मदत झाली. त्यानंतरच्या काळात शहरातील अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर पोलिसांचे काही प्रमाणात दुर्लक्षच राहिले. त्यामुळे कोणत्याही ठोस कारवाया झाल्या नाहीत. परिणामी, अवैध धंदे व छोट्या व्यावसायिकांकडून होणारी वसुली छुप्या पद्धतीने बिनबोभाट सुरू राहिली. युवकांच्या टोळक्यांचा ठिकठिकाणी उपद्रव सुरूच आहे.

हेही वाचा: मठावरील 'ते' किस्से आम्हाला जनतेपुढे सांगावे लागतील

निवडणुका संपल्यानंतर अशा लोकांचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे त्यांचे उद्योगही सुप्तपणे सुरू राहतात; परंतु निवडणुकांच्या वर्षात आपले अस्तित्व व उपद्रवमूल्य दाखविण्याच्या प्रयत्नात अशा प्रवृत्ती उफाळून येत असतात. त्याची चुणूक परवा शहरात झालेल्या सशस्त्र हल्ल्यातून दिसून आली. आगामी कालावधीत शहरामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही. सुरवातीच्या प्रकारांमध्येच पोलिसांकडून कडक कारवाई झाली, तरच इतरांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पोलिसांची गुन्हेगारांवरील जरब वाढली, तरच भविष्यात निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर अंकुश बसू शकतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहर परिसरातील शंभरपेक्षा जास्त जणांच्या तडीपारीचे आदेश काढले आहेत. त्याच पद्धतीने पालिका निवडणुकींचा विचार करून पोलिसांनी आतापासूनच कामाला लागणे आवश्यक आहे.

हेही वाचा: इंद्रदेव चंद्रगुप्तला म्हणाले, पृथ्वीवर मोदींचं भाषण सुरुय

गोपनीय यंत्रणा ॲक्टिव्ह करणे आवश्‍यक

सातारा पालिकेच्या हद्दवाढीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. प्रभागांची संख्या वाढल्याने सहाजिकच इच्छुकांची संख्याही वाढणार आहे. परिणामी सातारा पालिकेसाठी होणारा संघर्षही मोठा असणार आहे. त्यामुळे शहर व शाहूपुरी पोलिसांनी या वाढीव भागातील प्रवृत्तींचा माग आतापासूनच काढावा लागणार आहे. उपद्रवी घटक बाहेर कसे राहतील, यासाठी रणनीती आखावी लागणार आहे. त्यासाठी शहर व शाहूपुरी पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा ॲक्टिव्ह करणे गरजेचे आहे.

loading image
go to top