esakal | प्रांताधिकाऱ्यांनी 'आरोग्य'ला पाजले सुरक्षेबाबतचे डोस

बोलून बातमी शोधा

Vaccine
प्रांताधिकाऱ्यांनी 'आरोग्य'ला पाजले सुरक्षेबाबतचे डोस
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : येथील कोविड हॉस्पिटलमध्ये लसीकरणाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णांची चौकशी करण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू असल्याचे आज प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी हॉस्पिटलला दिलेल्या भेटी दरम्यान निदर्शनास आले. त्यावर तातडीने लसीकरण केंद्र बाजूला सुरक्षित ठिकाणी हलविण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

येथील ग्रामीण रुग्णालयात 36 ऑक्‍सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल पुन्हा कार्यरत झाल्याने 15 दिवसांपासून नियमित रुग्णांना रुग्णालयाचा दरवाजा बंद झाला आहे. मात्र, तेथे यापूर्वी सुरू असलेला कोविड प्रतिबंधक लसीकरण विभाग हलवायचा कुठे? असा प्रश्न उभा राहिल्याने ते आहे. तेथेच सुरू ठेवले आहे. रुग्णालयात पाठीमागे कोविड रुग्णांचे तीन वॉर्ड आणि पुढे लसीकरण कक्ष सुरू असल्याने लसीकरणास येणाऱ्यांत चिंतेचे सावट आहे. सकाळपासून लस घेण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी करणारे नागरिक आणि त्याच गर्दीतून वाट काढत इकडे- तिकडे फिरणारे ऍडमिट रुग्णांचे नातेवाईक असे गेल्या 15 दिवसांपासून कायम असलेले चित्र आज प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी स्वतः पाहिले. त्याच क्षणी त्यांनी हे केंद्र बाजूला सुरक्षित ठिकाणी हलविण्याबरोबरच रुग्णालयाच्या गेटमधून लसीकरणास येणाऱ्याशिवाय अन्य लोकांना प्रवेश देऊ नका, आवारात मोठ्या प्रमाणात लागणारी वाहने बाहेरच उभी करा. सुरक्षा व्यवस्था कडक करा, अशा सूचना संबंधितांना दिल्या. स्वतः ग्राउंडवर उतरून त्यांनी या वेळी गर्दीला शिस्त लावण्याचाही प्रयत्नही केला.

Video पाहा : आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रेमला कांबळे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य नानासाहेब साबळे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. लसीकरण केंद्र हलविण्यासाठी प्राथमिक शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र, त्याऐवजी इतर लोकांची वर्दळ रोखून रुग्णालयाच्या एका बाजूला मंडप घालून लसीकरण केंद्र सुरू करण्याचे ठरले.

कोरोनाला रोखण्यासाठी वाईत 'कोविड टास्क फोर्स'; रुग्णांसह कुटुंबीयांना करणार मदत

महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचं मोठं योगदान : पालकमंत्री बाळासाहेब पाटील