esakal | महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचं मोठं योगदान : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil
महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचं मोठं योगदान : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज 61 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यांच्या विचारधारेवरच शासन काम करीत आहे. महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोठे आहे. देशावर तसेच राज्यावर कोरोनाचे संकट आहे. नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनामित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते जनतेला संबोधित करताना बोलत होते. या शासकीय ध्वजारोहणास प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

15 मे'पर्यंत लावलेला लॉकडाउन पूर्णपणे पाळा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन