esakal | ‘किसन वीर’वर फक्त ३२५ कोटींचे कर्ज : भोसले I Satara
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

‘किसन वीर’वर फक्त ३२५ कोटींचे कर्ज : भोसले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत तीन पराभवांनंतर आता कारखान्यांवर आठशे ते हजार कोटींचे कर्ज असल्याचे सांगून कारखान्यांची नाहक बदनामी करण्याचे काम वाईचे आमदार व त्यांच्या बंधूंनी चालविले आहे. मुळात ३२५ कोटींच्या वर एक रुपयाही अतिरिक्त कर्ज कारखान्यावर नाही. ते धादांत खोटे बोलत असून, त्यांनी आरोप केलेल्या निम्मी जरी रक्कम निघाली तर मी कारखान्याच्या कामकाजातून व सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, असे प्रतिपादन माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान, किसन वीर कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करणार असून, त्यापूर्वी थकीत एफआरपीही शेतकऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किसन वीर कारखान्याला आर्थिक साह्य मिळू नये, म्हणून आमदार व त्यांच्या बंधूंनी प्रयत्न केले, असा आरोपही त्यांनी केला.

loading image
go to top