'कटकारस्थाने रचून मेडिकल कॉलेज फुकटात बळकावण्याचा भाजप आमदाराचा कुटिल डाव' I BJP MLA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayakumar Gore

'..म्हणूनच पळपुटी भूमिका न घेता डॉ. देशमुख ईडीच्या चौकशीला सामोरे गेले.'

'कटकारस्थाने रचून मेडिकल कॉलेज फुकटात बळकावण्याचा भाजप आमदाराचा कुटिल डाव'

मायणी (सातारा) : मेडिकल कॉलेजच्या (Medical College) आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांना संस्थेत भागीदारी दिली. तसे करारपत्र तयार करण्यात आले. मात्र, २०१९ पासून आजअखेर गोरेंनी संस्थेवरील कर्जाचा एक रुपयाही भागवला नाही. त्याउलट संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. एम. आर. देशमुख (Dr. M. R. Deshmukh) यांच्याविरुद्ध कटकारस्थाने रचून मेडिकल कॉलेज फुकटात बळकावण्याचा त्यांचा कुटिल डाव आहे. तो कधीच यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh) यांनी दिला आहे.

देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली माहिती अशी, मायणी येथील मेडिकल कॉलेजच्या (Mayani Medical College) विकासासाठी काढलेली कर्जे भागविण्यासाठी आमदार गोरेंना येथील मेडिकल कॉलेजची भागीदारी देण्यात आली. मात्र, आजअखेर त्यांनी एक रुपयाही कर्ज भागविले नाही. त्याउलट, संस्थेचे खजिनदार अरुण गोरे यांनी संस्थेविरोधात ईडीकडे (ED) तथ्यहीन तक्रार केली. वास्तविक, कोरोनाकाळात गोरेंनी केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला. तरीही त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. ज्यांनी दुष्काळी भागात शून्यातून मेडिकल कॉलेज उभारले. त्यांच्यावरच ईडीने कारवाई केली. ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आहे.

हेही वाचा: मी भाजपमध्ये असूनही अजित पवारांचं मला चांगलं सहकार्य : आमदार शिवेंद्रराजे

म्हणूनच पळपुटी भूमिका न घेता डॉ. देशमुख ईडीच्या चौकशीस सामोरे गेले. सन २०१२-१३, १३-१४ व १४-१५ या तीन वर्षांत रितसर प्रवेश घेऊन एमबीबीएसचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रवेश अनियमित ठरवून २० कोटी रुपयांचा दंड महाराष्ट्र शासनास ठोठावला. तो दंड संस्थेकडून वसूल करण्याचे आदेशही शासनास दिले. त्यानुसार कोर्टात दंड भरून शासनाने संस्थेकडे वसुलीचा तगादा लावला. महसूल विभागाने कॉलेजवर कारवाई करून तेथील विद्यार्थ्यांना अन्यत्र प्रविष्ठ करून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा होणारी संपूर्ण फी कॉलेजला मिळू शकली नाही. जमा फी कॉलेजच्या विकासासाठी खर्च झाली. यासंदर्भात सर्व चौकशींना सामोरे जाण्याचे संस्थेने ठरविले आहे.

Web Title: Deepak Deshmukh Criticism Of Mla Jaykumar Gore Over Mayani Medical College

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top