

Shivendrasinhraje attacking MLA Shashikant Shinde over the Degav MIDC issue during a public address.
Sakal
सातारा : बाहेरच्यांनी साताऱ्यात येऊन आपल्याला तत्त्वज्ञान शिकवायचे काम नाही. महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे, सुवर्णादेवी पाटील यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. देगावची एमआयडीसी कोणी घालवली. ती गेली तर भाजपने ८४ एकरांत आयटी पार्क आणला. देगावला मिळालेली एमआयडीसी याच शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे काढून घेण्यात आली. हे सातारकरांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे केले.