

Commuters Demand Urgent Action as Accidents Mount on Pune–Bengaluru Route
sakal
आनेवाडी : पुणे- बंगळूर महामार्गावरील रस्ता नव्याने डांबरीकरणासाठी काही दिवसांपूर्वी उखडण्यात आला आहे. मात्र, कामाला विलंब होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे, सैल खडी व धुळीमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.