'जनता'च्या संचालकांवर गुन्हे दाखल करा; घोटाळेबाजांविरोधात ठेवीदार समिती आक्रमक

सचिन शिंदे
Saturday, 12 December 2020

संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून ठेवीदारांचे पैसे परत करावेत. कराड जनताचे रिझर्व्ह बँकेने सक्षम बँकेत विलीनीकरण करावे अशा आग्रही मागण्यांसाठी यापुढच्या काळाच तीव्र लढा देण्याचे कराड जनता बँक बचाव व ठेवीदार कृती समितीच्या कऱ्हाडातील बैठकीत ठरेल.

कऱ्हाड (जि. सातारा) : कराड जनता सहकारी बँकेला कर्जवाटपात आर्थिक घोटाळे करून दिवाळखोरीपर्यंत पोचवणाऱ्या संचालकांवर रिझर्व्ह बँकेने गुन्हे दाखल करावेत, यासाठी लढा उभा करण्याचा निर्णय नुकताच येथे कराड जनता बॅंक बचाव कृती समितीच्या बैठकीत झाला. 

संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून ठेवीदारांचे पैसे परत करावेत. कराड जनताचे रिझर्व्ह बँकेने सक्षम बँकेत विलीनीकरण करावे अशाही आग्रही मागण्यांसाठी यापुढच्या काळाच तीव्र लढा देण्याचे ठरले. कराड जनता बँक बचाव व ठेवीदार कृती समितीची बैठक झाली. यावेळी कृती समितीचे सचिव विवेक ढापरे, उपाध्यक्ष दिनेश पेंढारकर, मार्गदर्शक आर. जी. पाटील, नितीन मोटे, विकास पाटील, सुरेश जाधव, प्रा,बुटीयानी, वाईचे श्री. रानडे उपपस्थित होते. त्यासह वाई, लोणंद, पाल, रहिमतपूर, कडेगाव, सातारा, काले, कऱ्हाड, महाबळेश्वर येथील वीदार उपस्थित होते.

ऐंशी वर्षाच्या योद्ध्यावर वरुणराजाचा जलाभिषेक; ऐतिहासिक सभेची सातारकरांना आजही आठवण!

बँक घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, तसेच या बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करावे अशा मागणीचे निवेदन सर्व ठेवीदारांच्या सह्या घेऊन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांना प्रत्यक्ष भेटून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे लिक्विडेटर मनोहर माळी यांनी फोनवरून बैठकीस संबोधित केले. त्यांनी पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळवण्यासाठी संबंधित शाखेत केवायसी कागदपत्रे देण्याचे आवाहन केले. बँकेचे ऑडिट करण्यासाठी जठार यांची नेमणूक केली, असेही त्यांनी सांगितले. पाच लाखांवरील ठेवीसाठी कर्जाची वसुली करून प्रयत्न करणार आहे, असेही श्री. माळी यांनी सांगितले. लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आर. जी. पाटील यांचा सत्कार झाला. यावेळी आर. जी. पाटील, विवेक ढापरे, विकास पाटील, सुरेश जाधव, श्री. देसाई यांनी मार्गदर्शन केले. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांतील 1727 संस्था अडचणीत; बॅंकेच्या दिवाळखोरीने आर्थिक संकट

अशी असेल बचाव समिती..

कराड जनता बॅंक बचाव कृती समितीच्या शाखा होणार आहेत. त्या प्रत्येक शाखा परिसरातील पाच सभासदांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर तीव्र आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, असे बैठकीत ठरले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Action Against The Directors Of Karad Janata Bank Satara News