'कऱ्हाड जनता'तील दोषींवर 'रिझर्व्ह'ने गुन्हा दाखल करावा; ठेवीदारांची आग्रही मागणी

सचिन शिंदे
Wednesday, 9 December 2020

रिझर्व्ह बँकेने कऱ्हाड जनता बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. मात्र, त्या ती बँक ठरवून पद्धतशीरपणे लुटली आहे. 2015 साली बँकेत बोगस कर्ज वाटप होत आहे, अशी माझीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. 500 कोटी हून अधिक ठेवी असणाऱ्या कऱ्हाड जनता सहकारी बँकेतून त्याच पट्टीतून झालेले कर्ज वाटप धोक्याचे ठरले असल्याचा आरोप आर. जी. पाटील यांनी केली.

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत जाणे धक्कादायक आहे, त्या बॅंकेत झालेल्या गैरव्यवहारात दोषी असणाऱ्यांविरोधात रिझर्व्ह बॅंकेसह ईडीने गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून ठेवीदारांच्या हितीचे रक्षण करावे, अशी मागणी ठेवीदारांतर्फे बॅंकेचे सभासद विवेक ढापरे, आर. जी. पाटील यांनी केली. कऱ्हाड जनता बॅंकेत वीस वर्षांपासून गैरव्यवहार सुरू आहेत. त्यामुळे पद्धतशीरपणे बँकेची लूट केली असल्याचाही आरोप श्री. पाटील यांनी केला आहे.

ढापरे म्हणाले, कऱ्हाड जनता बॅंक सामान्यांची बॅंक आहे, अशीच तीची ओळख होती. काही ठराविक लोकांच्या नियमबाह्य कारभारामुळे कऱ्हाडची मोठी बॅंक दिवाळखोरीत निघाली आहे. सन 2000 पासून गैरव्यवहार होत असूनही ऑडिटमध्ये "अ' वर्ग देणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करणे रिझर्व्ह बँकेची प्राथमिक जबाबदारी आहे, रिझर्व्ह बँकेने दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत व अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) मनी लॉडरिंग कायद्यानुसार दोषींच्या मालमत्तेवर टाच आणावी. ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करावे, रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेप्रमाणे एखाद्या सक्षम बँकेत कऱ्हाड जनता बँकेचे विलीनीकरण करावे. 

कऱ्हाड जनता बॅंकेच्या चार कर्जदारांमुळे दोन लाख ठेवीदार वेठीस

पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेने कऱ्हाड जनता बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. मात्र, त्या ती बँक ठरवून पद्धतशीरपणे लुटली आहे. 2015 साली बँकेत बोगस कर्ज वाटप होत आहे, अशी माझीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. 500 कोटी हून अधिक ठेवी असणाऱ्या कऱ्हाड जनता सहकारी बँकेतून त्याच पट्टीतून झालेले कर्ज वाटप धोक्याचे ठरले आहे. त्यातील चारच खाते दारांना बोगस कर्ज वाटप झाले आहे. त्या कर्जात आजपर्यंत एक रुपायाही परत आला नाही. त्याची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती. मात्र, पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात आले आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या कऱ्हाड जनता सहकारी बँकेचे शेकडो ठेवीदार आहेत. त्या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता कऱ्हाड जनता बँक दिवाळखोरीत आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशांचं काय, याचा खुलाही होणे गरजेचे आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Action Against Guilty Officials Of Karad Janata Bank Satara News