esakal | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून गावे वगळा; कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Sahyadri Tiger Project

कांदाटी खोऱ्यात जमीन भूस्खलन आणि डोंगर, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून गावे वगळा; कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची मागणी

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : मुसळधार पावसाने (Heavy Rain) कांदाटी खोऱ्यात (Kandati Valley) जमीन भूस्खलन आणि डोंगर व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. हे सर्व प्रकार क्षेत्रात असूनही वन विभागाने (Forest Department) घेतली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. म्हाळुंगे, मोरणी आरव, पुनर्वसित मोरणी, वलवण, शिंदी, चकदेव, पर्वत व मेटशिंदी ही गावे कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary) आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (Sahyadri Tiger Project) संरक्षित बफर झोनमधून वगळावीत, अशी मागणी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.

जुलै महिन्याच्या २२ व २३ तारखेला कांदाटी खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने आरव येथे बैठक झाली. त्यात ग्रामस्थांसह कांदाटी विकास संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी निवेदन तयार करण्यात आले. कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टी होऊन फार मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. कित्येक हेक्‍टर क्षेत्र नष्ट झाले असून, फार मोठ्या प्रमाणात जंगलही नष्ट होऊन भागातील १६ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या खोऱ्यामध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के भूस्खलन हे वन जमिनीमध्ये आहे. येथील जैविक व निसर्गाची फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली असताना आजपर्यंत वन विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी या भागांमध्ये फिरकला नाही. कोयना अभयारण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे झाडांची, वन्य प्राण्यांची व स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: ज्यांनी जंगलं नष्ट केली, त्यांचा 'सूड' घेण्यासाठी 80 किलोचे उंदीर रस्त्यावर

अभयारण्याचे संरक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी वन विभागाची असतानासुद्धा आजपर्यंत या भागांमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी गेलेला नाही. अभयारण्य घोषित करून त्यातून वन्यजीव संवर्धन व स्थानिक लोकांसाठी सुविधा, उपाययोजना राबवल्या जात नसतील तर त्या अभयारण्य प्रकल्पाचा काय उपयोग, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. कांदाटी खोऱ्यातील सात गावे अभयारण्यातून वगळण्यात यावीत, अशी मागणी बैठकीत सर्वानुमते करण्यात आली आहे. या निवेदनात अध्यक्ष मारुती कदम, सचिव हनुमंत भोसले, खजिनदार राजाराम जाधव यांच्या सह्या आहेत.

loading image
go to top