सातारा : कोविड उपाययोजनांसाठी ७० कोटींची मागणी

आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन सज्ज
covid
covidsakal
Updated on: 

सातारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा(third wave of corona) सामना करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध(corona restrictions) लागू केले आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हिटी रेटही १२ टक्क्यांपर्यंत गेला असून रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. आगामी काळात नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा, उपचार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने ७० कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या(satara corona update) वाढू लागली आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्‍हिटीचा रेट हा १२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने आता तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आतापासूनच बाधितांवर चांगल्या प्रकारे व वेळेत उपचार मिळावेत, म्हणून तयारी सुरू केली आहे.

केवळ २५ कोटी उपलब्ध

मागील दोन वर्षांत आलेल्या कोरोनाच्या दोन लाटांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती. पण, त्यापैकी केवळ २० ते २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पण, मागील काळात जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. त्यामध्ये जम्‍बो कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा, कोरोना केअर सेंटर, कोरोना हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.

गृहविलगीकरणावर भर

या वेळचा कोरोनाचा विषाणू वेगाने संसर्ग करत असल्याने एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांना त्याची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. हे संसर्ग चक्र थांबवण्यासाठी गृहविलगीकरण, संस्थात्मक विलगीकरण आदी गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे.

covid
वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

उपलब्ध सुविधांचा वापर

सध्याच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना पायाभूत सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्याऐवजी उपलब्ध स्ट्रक्चरमध्ये साहित्याची उपलब्धता करावी लागणार आहे. यामध्ये रेमडेसिव्‍हर इंजेक्शन, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, तपासणी किट आदींचा समावेश आहे. त्यामुळे वाढणारा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तब्बल ७० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी टप्प्या-टप्प्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

निधी मिळण्याबाबत साशंकता

मागणी दोन लाटेंचा सामना करताना १०० कोटींच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. पण, त्यापैकी केवळ २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधी अद्याप मिळणे बाकी आहे. त्यातच आणखी ७० कोटींची मागणी जिल्हा प्रशासन करणार असल्याने यावेळेस तरी पुरेसा निधी शासनाकडून मिळणार का, हा प्रश्न आहे.

covid
सातारा : तालुकानिहाय कोविड सेंटर उद्यापासून सुरू होणार

‘जम्‍बो’ सुरू करण्यासाठी निधी लागणार

सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता वेग पाहता रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, काशीळ जम्‍बो हॉस्पिटल, वडूज येथील कंटेनर हॉस्पिटल तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. गरज पडल्यास प्रशासन जम्‍बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरू करणार आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime Armed Men Enter Home And Allegedly Abduct Young Woman At Gunpoint In Front Of Her Family
Satara District Bank Election Scrutiny Sees Seven Objections Lawyers Argue Over Cooperative Law And Candidate Eligibility
Kisan Veer Sugar Factory Salary Crisis Workers Protest Over Unpaid Wages Anger Grows Against Makarand Patil And Nitin Patil
Pune Bengaluru Highway to Karad City
Marathi News Esakal
www.esakal.com