वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

श्यामसुंदर इंगळे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेप, पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली
murder
murdersakal

सातारा : साठेफाटा ( ता. फलटण) येथे वडिल नारायण यांचा खून करणाऱ्या श्यामसुंदर इंगळे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश(Judge) मंगला धोटे यांनी जन्मठेप,(Life imprisonment) पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.

murder
ठेवीची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

याबाबतची माहिती अशी की, दि. ३0 मे २0१८ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शामसुंदर आणि वडील नारायण भिकू इंगळे यांच्यात स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वाद झाला. वादानंतर संतप्त झालेल्या शामसुंदरने रागाच्या भरातच 'तुला आता जीवंत ठेवत नाही,' असे म्हणतच वडील नारायण यांच्यावर शहाबादी फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवत डोके, कपाळ आणि कानावर घाव घातला. यात नारायण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शामसुंदर याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.(Satara crime news)

murder
कित्तुर येथील निवासी गृहातील 80 विद्यार्थ्यांनीना कोरोनाची लागण

दरम्यान, जखमी नारायण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे श्यामसुंदरवर खूनाचा दाखल करण्यात आला. याचा तपास फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्यासमोर सुरु होती. सुनावणीदरम्यान, सरकार पक्षाच्यावतीने अ­ॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश आरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि तो न दिल्यास सहा महिने साधी शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com