Satara : सातारा- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुसेगावमधूनच व्हावे; विशेष ग्रामसभेमध्ये एकमुखी ठराव

प्रशासन पुसेगावच्या बाह्य वळण रस्त्यासाठी आग्रही आहे; परंतु गावाचे गावपण टिकावे आणि बाजारपेठेतून नागरिकांची ये-जा व्हावी, यासाठी गावातूनच सातारा- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, असा एकमुखी ठराव येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेमध्ये केला.
puswgaon
puswgaonsakal
Updated on

पुसेगाव : सातारा- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, परंतु पुसेगावचे गावपण टिकावे आणि बाजारपेठेतून नागरिकांची ये-जा व्हावी, यासाठी बाह्य वळण रस्त्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे. यासाठी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेमध्ये एकमुखी ठराव केला. श्री सेवागिरी मंदिरातील प. पू. नारायणगिरी भक्त निवास हॉल येथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या वेळी विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, माजी सरपंच ॲड. श्रीकृष्ण जाधव, बाळासाहेब जाधव, प्रदीप जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com