esakal | अफगाणिस्तानात तालिबानचं आज नवं सरकार; मुल्ला बरादर असणार 'प्रमुख'
sakal

बोलून बातमी शोधा

Mulla Abdul Gani Barada

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं (Taliban) नवीन सरकारची घोषणा केलीय.

अफगाणिस्तानात तालिबानचं आज नवं सरकार; मुल्ला बरादर असणार 'प्रमुख'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

काबुल : अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर तालिबाननं (Taliban) नवीन सरकारची घोषणा केलीय. यात तालिबानचे प्रमुख मुल्ला बरादर (Mullah Baradar) नव्या सरकारचे प्रमुख असतील, तर तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादाला (Mullah Haibatullah Akhundzada) अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता बनवलं जाण्याची शक्यता आहे. अल-अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानचे दिवंगत संस्थापक मुल्ला उमर यांचे पुत्र मुल्ला मोहम्मद याकूब आणि शेर मोहम्मद अब्बास स्तानिकजई हेही या सरकारमध्ये वरिष्ठ पदांवर असणार आहेत.

मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mulla Abdul Gani Baradar) हे त्या चार लोकांपैकी एक आहेत, ज्यांनी 1994 मध्ये तालिबानची स्थापना केली. सन 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानात सैन्यानं कारवाया सुरू केल्या, तेव्हा मुल्ला बरादर यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली होती. अमेरिकन सैन्यानं बरादरला अफगाणिस्तानात शोधायला सुरुवात केली, पण तो पाकिस्तानात पळून गेला होता.

हेही वाचा: विधानसभेवेळी माझ्याकडून मोठी चूक झाली; NCP आमदाराची जाहीर कबुली

2010 मध्ये बरादरला आयएसआयने कराचीतून अटक केली होती. अमेरिकेच्या विनंतीनुसार त्याला 2018 मध्ये सोडण्यात आलं. सध्या, बरादर हा तालिबानचा राजकीय प्रमुख आणि गटाचा महत्वाचा चेहरा आहे. बरादर 1980 च्या दशकात सोव्हिएत सैन्याविरुद्ध अफगाण मुजाहिदीनमध्ये लढला. 1992 मध्ये रशिया बाहेर पडल्यानंतर प्रतिस्पर्धी सरदारांमध्ये गृहयुद्ध भडकले. त्या वेळी बरादरनं त्याचा माजी कमांडर आणि नातेवाईक मोहम्मद उमर यांच्यासह कंधारमध्ये मदरसा स्थापन केला होता. 90 च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबानची स्थापना झाली. त्याचे प्रमुख मुल्ला मोहम्मद उमर होते. असं म्हटलं जातं, की बरादरची बहीण मुल्ला ही ओमरची पत्नी होती. 90 च्या दशकातील कुख्यात तालिबान राजवटीतील तो दुसरा प्रमुख नेता होता.

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती

तालिबानच्या बड्या नेत्यांना अखुंदजादाचा ठावठिकाणाही माहित नाही

अफगाणिस्तान सरकारमध्ये हैबतुल्लाह अखुंदजादाला देशाचा सर्वोच्च नेता बनवणार असल्याचं कळतंय. तो असा दहशतवादी आहे, ज्याला त्याच्या स्वतःच्या संस्थेचे फार कमी लोक पाहू शकतात. तालिबानच्या अनेक बड्या नेत्यांना त्याचा ठावठिकाणाही माहित नाही. तो दैनंदिन जीवनात काय करत आहे, हे तालिबान लढाऊंनाही माहीत नाही. मात्र, इस्लामिक सणांवरील व्हिडिओ संदेशांद्वारे तो निश्चितपणे दहशतवाद्यांना संदेश पाठवत असतो.

loading image
go to top