ठरलं तर! राज्यात 75 विशेष रोपवाटिकांची निर्मिती : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्वपूर्ण निर्णय

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 27 August 2020

राज्यात 75 ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत, तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना हेरीटेज म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सह्याद्री वनराईच्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात घनवन तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

सातारा : सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वृक्षलागवडी संदर्भातील विविध विषयांवर मुंबईत नुकतीच बैठक झाली. शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून 'सह्याद्री देवराई' संस्थेच्या सहकार्यानं स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या हिरकमहोत्सवानिमित्त राज्यात 75 विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून 'सह्याद्री देवराई' संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांची लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. २६) दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वृक्षलागवडी संदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी वनमंत्री संजय राठोड, सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 135 नागरिक झाले बरे; 455 नागरिकांचे नमुने तपासणीला

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वनविभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांची लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिलांसाठी ठरतेय नवसंजीवनी

तसेच राज्यात 75 ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत, तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना हेरीटेज म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सह्याद्री वनराईच्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात घनवन तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Held Meeting With Actor Sayaji Shinde